Subscribe Us

header ads

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या तपोभूमीत रंगले कविसंमेलन

चिमूर / रोहित रामटेके:

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या गोंदेडा तपोभूमीत दि.१७ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान गुंफा यात्रा महोत्सव संपन्न होत आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुरु केलेल्या या यात्रा महोत्सवाचे यावर्षीचे ५९ वे वर्ष आहे.या महोत्सवादरम्यान विविध उपक्रम राबविले जातात.या महोत्सवात शिक्षक साहित्य संमेलन संस्था व झाडीबोली साहित्य मंडळाच्या वतीने प्रतिथयश तथा नवोदित कवींचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले.

कविसंमेलनाचे उद्घाटन गुरुदेव सेवा मंडळ,चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस प्रा.राम राऊत यांचे हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थान गुरुदेव सेवा मंडळ गडचिरोली जिल्हा सेवाधिकारी प्राचार्य भाऊराव पत्रे यांनी भूषविले.प्रमुख अतिथी म्हणून अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ,गुरुकुंज मोझरीचे आजीवन प्रचारक तथा गोंदेडा गुंफा यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव सावरकर,प्रा.डॉ.सुधीर मोते,कवी भानुदास पोपटे,कवी प्राचार्य सदानंद लोखंडे,कवी व चित्रकार बंसी कोठेवार,संजय खेडीकर उपस्थित होते.उद्घाटक प्रा.राम राऊत यांनी तुकडोजी महाराज हे स्वतः साहित्यिक होते.त्यांच्या भजनांनी चिमूर व आष्टी येथे ऐतिहासिक क्रांती झाली.हा क्रांतीचा वणवा अनेकांनी आपल्या साहित्यातून पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रसंतांच्या भूमीत कविसंमेलनाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.प्राचार्य भाऊराव पत्रे यांनी राष्ट्रसंतांच्या भूमीत असे साहित्यिक उपक्रम होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.विठ्ठलराव सावरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक कवी सुरेश डांगे यांनी केले.संचालन सविता झाडे तर आभारप्रदर्शन गुरुदास गभणे यांनी केले.

कविसंमेलन भद्रावती येथील कवी प्रा.डॉ.सुधीर मोते यांचे अध्यक्षतेत झाले. कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन कवयित्री संध्या बोकारे यांनी केले.कविसंमेलनात भानुदास पोपटे,यशवंत कायरकर,बंसी कोठेवार,धनराज गेडाम,देवराव बावणे,विठ्ठलराव गिरडकर,पुरुषोत्तम साळवे,प्रकाश मेश्राम,रामदास राऊत,डॉ.शिलवंत मेश्राम,सदानंद लोखंडे,जितेंद्र भोयर,मनोज सरदार,नरेंद्र मेश्राम,गुरुदास गभणे,मोहन सातपैसे,सविता झाडे,सदानंद लोखंडे,राकेश सोनुले,महेश गिरडकर,आनंद बोरकर,रा.ग.बारापात्रे,नत्थूजी मडावी,सदाशिव नन्नावरे,विलास मेश्राम,सुधाकर चौधरी,खुशिया सोनुले,कोमल गजभिये,नंदिनी कोटरंगे,चांदणी गुरुनुले,सृष्टी कामडी,चेतना मोहुर्ले,अनिषा मोहुर्ले यांनी आपल्या वैविध्यपूर्ण व बहारदार कविता सादर केल्या.कवींना सन्मानपत्र व पुस्तक देऊन गौरविण्यात आले.आभारप्रदर्शन आनंंद बोरकर यांनी केले.कविसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी संयोजक सुरेश डांगे,विठ्ठलराव वाढई,सुधाकर चौधरी,नामदेव घोडाम,राकेश सोनुले तथा गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या