Subscribe Us

header ads

विद्यार्थ्यांनो ड्रग्स विरोधातील लढ्यासाठी सज्ज व्हा:किशोर जोरगेवार

ड्रग्स जनजागृती कार्यक्रम,संपन्न शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
चंद्रपूर/प्रतिनिधी:

ड्रग्सची लत चंद्रपुरातील युवकांचे भविष्य अंधारात झोकत आहे. हा प्रकार डोळ्यांसमोर घडत असतांना डोळे झाक करून गप्प बसने सज्ज नागरिकाचे लक्षण नाही. याविरोधात लढा उभारून ड्रग्सला चंद्रपुरातून हद्दपार करण्याची गरज आहे. आणि हे तुमच्याशिवाय शक्य नाही. त्यामूळे आता ड्रग्स विरोधातील लढ्यासाठी सज्ज व्हा असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते किशोर जोरगेवार यांनी विध्यार्थ्यांना केले. पटेल हायस्कुल अँल्युमनी फाउंडेशन, चंद्रपूर तथा स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर, व यंग चांदा ब्रिगेटच्या वतीने इंदिरा गांधी प्रियदर्शनी सभागृहात ड्रग्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मागदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी डॉ. सुप्रिया देशमुख यांची मुख्य वक्त्या म्हणून मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना जोरगेवार म्हणाले की, सिनेमात पाहिलेला ड्रग्सचा जीवघेणा प्रकार आता चंद्रपुरात पाहायला मिळत आहे. मागील काही महिन्यात ड्रग्सचे सेवन करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गंभीर्याची बाब म्हणजे यात शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन युवक आणि युवतींचा सहभाग आहे. पोलीस प्रशासन या विरोधात जनजागृती करत असला तरी त्याचा हवा तसा परिणाम झालेला नाही. परिणामी उद्याचे भविष्य असलेल्या चंद्रपूरच्या युवकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे ड्रग्स विरोधातील लढा आता लोकाभिमुख लढा करणे गरजेचे आहे. मी मागील अनेक महिन्यापासून या विरोधात आवाज उचलत आहे. फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातूनही मी या विरोधात जनजागृती करण्याचे काम करत आहे. मात्र आता याचे स्वरूप विस्तारित करण्याची वेळ आली असून प्रत्येक शाळा महाविद्यालयात या विरोधात जनजागृती करण्याची गरज आहे. त्यात मला तुमची साथ हवि असून या विरोधातील लढयात आपल्या सक्रिय सहभागाची आवश्याक्यता आहे. असे सांगत जोरगेवार यांनी सध्याची चंद्रपूरची उभय परिस्थती लक्षात घेता ड्रग्स चंद्रपूर शहरात कशा पद्धतीने थैमान मांडत आहे याचे वास्तववादी जिवंत चित्रण सभागृहासमोर मांडले तसेच ड्रग्सविरोधातील लढ्यासाठी तुम्ही पूर्ण ताकतीने सज्ज व्हावे आणि ड्रग्सला चंद्रपूरच्या सीमेपलीकडे हद्द पार केल्याशिवाय शांत बसू नये असे आव्हाहन यावेळी बोलतांना किशोर जोरगेवार यांनी विद्यार्थ्यांना केले.

यावेळी सुप्रिया देशमुख यांनी ड्रग्स सेवन केल्याने शरीर व मेंदू निकामी होतात व त्यामुळे मानव हा मतीमंद होतो असे सांगत ड्रग्स घेण्याची कारणे, ड्रग्स लागण झाल्या नंतर शरिरावर होणारे परिणाम व दिसणारे परिणाम याची लाक्षणिक माहिती दिली. विद्यार्थी तथा शिक्षक तथा पालक यांच्या भूमिका कुठल्या व त्यांना ड्रग्स जनजागृती संबंधी पिढीताला वाचवीणे किंवा कुणी पिढीत होवू नये अशासाठी योग्य ते मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे एके काळी पंजाब हे राज्य नवजवान देणारा राज्य म्हणून देशात प्रसिद्ध होता पण त्या राज्यात ड्रग्सचे जाळे पसरले गेले व या राज्यात विद्यार्थी व युवक हे ड्रग्स च्या आहारी गेल्याने नवजवान भरती मध्ये आज राज्यातील अनेक विद्यार्थांना परतावे लागत आहे या सारखे अनेक उदाहरण देऊन ड्रग्स जनजागृती कार्यक्रमात मार्दर्शन केले.

यावेळी डॉ. पालीवाल यांनी थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन विद्यार्ध्यांशी परस्पर संवाद साधला. या कार्यक्रमाच्या निमित्याने अतिदुर्गम नक्षली भागात स्वताचे जीव धोक्यात टाकून अनेक वर्षापासून नक्सली हल्यात जखमी झालेल्या पोलीस जवानांवर मोफत उपचार करणाऱ्या डॉ. सतनाम सलुजा यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला. ह्या कार्यक्रमाकरिता समन्वयक म्हणून श्री भोला मडावी, श्री भालचंद्र हेमके तथा श्री प्रकाश निब्रड यांनी ह्या कार्यक्रमाकरिता आपापली जबाबदारी सांभाळत खुप मोलाची भूमिका पार पाडली तर कार्यक्रमाकरीता रवींद्र नंदनवार, विजय निरंजने, अमित कोवे, जितेंद्र मशारकर, श्रीकांत झाडे, मंगेश चवरे, प्रशांत बुरांडे, चारुशिला मालेकर, नलिनी चिकनकर, गीता नगराळे, प्रविण मेश्राम, प्रितम लोखंडे, युगेन वाडेकर, कार्तिक मुसळे यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परविन पठाण, आभार प्रदर्शन रजनी बोडेकर यांनी केले. फाऊंडेशनचे अध्यक्ष ह्या नात्याने प्रास्तविक भाषणातून मा. आश्विन मुसळे यांनी फाऊंडेशनला ड्रग्स जनजागृती कार्यक्रम का घ्यावा लागला ह्या बाबत विस्तृत माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या