Subscribe Us

header ads

CPCL सिजन-13 च्या लोगोचे अनावरण

चंद्रपूर/प्रतीनिधी:

जिल्ह्यात लोकप्रिय ठरलेल्या चंद्रपूर प्रोफेशनल क्रिकेट लीग या टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या आगामी तेराव्या पर्वाच्या नवीन लोगोचे अनावरण अँडव्होकेट रविजी भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.सीपीसीएल आयोजन समितीच्या वतीने मागील बारा वर्षांपासून या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्हयातील उच्च विद्या-विभुषित व्यावसायिक खेळाडूंना खेळण्याची आणि क्षमता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आगामी सिजन -13 येत्या 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान आयोजित होणार असून त्याचा लोगो आज अँड रविजी भागवत यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला.यावेळी सीपीएल आयोजन समितीचे अध्यक्ष डाँ मंगेश गुलवाडे,उपाध्यक्ष आसिफ शेख ,डाँ किशोर भट्टाचार्य,सचिव जितेंद्र मशारकर ,डॉ. चेतन खुटेमाटे यांचेसह,डाँ रोहीत उत्तरवार,अनुज सोनी,इंजिनीअर इजाज,
उमेश वासलवार,अमित सिंग,महेश बोंद्रे यांची उपस्थिती होतीCPCLच्या या प्रतियोगितेमध्ये आय एम ए,निमा,
जिलहा बार असोसिएशन,सिडीसिडीए,एमएसएमआरऐ,प्रेस,एमएसईसिटीएल व एईसिसि असे एकुण आठ संघ खेळणार आहे.

यावेळी पहिल्यांदाच सर्व सामने टर्फ विकेटवर खेळविण्यात येणार असल्याची माहीती आयोजन समितीने दीली. सिपीसिएल चा अंतिम सामना 3फेब्रुवारी ला पोलीस फुट बाँल ग्राउंडवर खेळविला जाईल.
य़ा CPCL क्रिकेट टुर्नामेंट ते सर्व चंद्रपूरकरांनी आनंद घेण्याचे जाहीर आवाहन आयोजकांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या