Subscribe Us

header ads

"प्रेमरंग" येतोय येत्या ८ फेब्रुवारीला


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभेच्छा।

नागपूर/ प्रतिनिधी
जिल्ह्यातील तरुणांनी एका मोठ्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकार केल्यामुळे नागपूरसह महाराष्ट्राचा गौरव वाढविल्याने या सर्वांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बहुचर्चित प्रेमरंग चित्रपटाला विशेष अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चित्रपटातील अभिनेते व निर्मात्यांचे अभिनंदन केले

प्रेमाची परिभाषा मांडणारा आणि कोकण व वऱ्हाडाच्या मातीशी नाळ जोडून ठेवणार शरद गोरे दिग्दर्शित बहुचर्चित "प्रेमरंग" हा मराठी चित्रपट येत्या ८ फेब्रुवारी रोजी एकाचवेळी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून या चित्रपटाचा मुख्य नायक बंटी मेंडके , सहनिर्माता आशिष महाजन, प्रशांत काळे यांच्यासह चित्रपटात सहकलाकार म्हणून भूमिका निभावणारे रुपेश भैसवार, आकाश मेंडके आहेत. 

जि.एस .एम .फिल्म्स निर्मित प्रेमरंग या मराठी चित्रपटाचे चिञीकरण भोर,महाड,वाई,महाबळेश्वर या परीसरात नुकतेच संपन्न झाले. प्रेमरंग या चिञपटाची कथा व पटकथा शरद गोरे व रविंद्र जवादे यांची असुन सवांद व गीते शरद गोरे यांची आहेत.कवी नितीन देशमुख यांचेही एक गीत या चिञपटात आहे. संगीतकार म्हणून शरद गोरे यांनी गीते संगीतबद्ध केली आहेत.सुप्रसिद्ध गायक राजेश दातार,राजेश्वरी पवार,राखी चौरे, अजित विसपूते यांनी गायन केले आहे. प्रशांत मांढरे या सुप्रसिद्ध छायाचित्रणकार यांनी चिञपटाचे छायाचित्रण केले आहे.कला दिग्दर्शक् म्हणून राहुल व्यवहारे,सांऊड इंजिनिअरिंग म्हणून निलेश बुट्टे यांनी काम केले आहे.

प्रसिध्द लेखक, दिग्दर्शक शरद गोरे, पटकथा लेखक रवींद्र जवादे यांच्या प्रेमरंग या चित्रपटात सुप्रसिध्द अभिनेता बंटी मेंढके, हिंदी चित्रपटातील नायिक रेहीना गिंग, मराठीतील अश्विनी सुरपुर, निलोफर पठाण, मेहेक शेख, पंकज जुनारे व नाटक कलेतील राष्ट्रीय पुरस्कार विजेते रमाकांत सुतार यांची प्रमुख भूमिका असणा-या चित्रपटात विनिता सोनवणे ने प्रमुख नायिकेची भूमिका साकारली आहे.
महाबळेश्वर, वाई, सातारा, कोकणात पार पडलेल्या चित्रिकरणामध्ये विनिताने आपल्या अभिनयकलेने सर्वांना भुरळ पाडली आहे. चित्रपटाचे सहनिर्माता विशालराजे बोरे, अशिष महाजन असून चित्रपटात प्रसिध्द कलाकारांसोबत काम करायची संधी विनिताला मिळाली आहे, प्रेमरंग हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.      कोण आहे विनिता सोनवणे      

विनिता सोनवणे ही मुळची सोलापूर शहरातील आहे. तिचे प्राथमिक व माध्यामिक शिक्षण सोलापूरातच पूर्ण झाले. चित्रपटसृष्टीत करिअर करण्याच्या जिद्दीने विनिताने पुणे गाठले. विनिताने पुण्यात चित्रपटसृष्टीचे करिअर घडवत पुण्यातील जनक्रांती महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. विनिताला महाविद्यालयीन स्तरावर असणा-या युवा महोत्सवातून अनेक प्रकारात आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यातूनच विनिता हिची चित्रपटासाठी काम करण्याची आफर आली. तिने आजपर्यंत दर्द, जर्नि आफ डेथ या हिंदी तर मनाची कावड या मराठी चित्रपटात तिने काम केले आहे. परंतू मुळची सोलापूर शहरातील व सध्या पुण्यात स्थायिक झालेली सामान्य कुटुंबातील विनिता सोनवणे या जिद्दी युवतीने हे स्वप्न प्रबळ इच्छेच्या जोरावर पूर्ण केले असून मराठी चित्रपटात पदार्पन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या