कोरपना प्रतिनिधी:-
कोरपना तालुक्यातील बिबी येथे कोरपना पंचायत समितीतील पशुसंवर्धन विभाग,मदर डेअरी पशुपालक,उमेद महिला बचतगट व माविम बचतगटांसाठी विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.अध्यक्षस्थानी विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प चंद्रपूर विभाग अध्यक्ष आशिष शुक्ला होते तर उमेदच्या अर्चना बोनसुले,बिबीचे माजी उपसरपंच प्रा.आशिष देरकर,पशुधन विकास अधिकारी डॉ.संदीप राठोड,डॉ.दिपक नागले,डॉ.जगदीश बोढे,डॉ. हरीदास ढेंगळे,मदर डेअरीचे ज्ञानेश्वर मोरे,उदय काकडे इत्यादींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.सदर कार्यक्रमात महिलांसह १२२
लोकांनी सहभाग नोंदविला होता.
0 टिप्पण्या