Subscribe Us

header ads

इमारत बांधकामासाठी अडीच वर्ष,विद्युत मिटरसाठी किती वर्षे लागणार ?

गडचांदूर:- सै.मूम्ताज़ अली.
   गडचांदूर हे औद्योगिक व तालुक्यातील सर्वात मोठे शहर आहे.येथील तलाठी साजा अंतर्गत 5 गाव समाविष्ट असून मंडल अधिकारी कार्यालय सुद्धा याच ठिकाणी आहे.स्थानिकांसह तलाठी साजा अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिक सातबारा,जमिनीचे फेरफार,उत्पन्न दाखले व इतर कामांसाठी याच कार्यालयात येत असल्याने याठिकाणी मोठी गर्दी पहायला मिळते.अपुरी जागा व संकुचित खोल्यांमध्ये सुरू असलेल्या सदर कार्यालयात लोकांना मोठ्याप्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब लक्षात घेऊन शासनाने याठिकाणी नवीन मोठी इमारत बांधण्याची परवानगी दिली.यासाठी सदर कार्यालय बाजूच्या एका किरायाच्या घरात तात्पुरता हलविण्यात आले आहे.एक वर्षात इमारत पूर्ण होऊन कार्यालय सुरू होईल अशी आशा होती मात्र अत्यंत संथगतीने करण्यात आलेल्या या कामाला जवळपास दोन ते अडीच वर्षाचा कालावधी लागला.कसेबसे इमारतीचे बांधकाम झाले मात्र अंदाजे दोन महिन्यापासून सदर इमारत फक्त विद्युत मीटर नसल्याने बंद पडल्याचे कळते.हल्ली शोभेची वस्तू व कुचकामी ठरलेल्या सदर इमारतीत विद्युत मिटर, बोअरवेलची व्यवस्था करण्यात आली तर किरायाची बचत होईल.तसेच नवीन व मोठ्या तलाठी कार्यालयात मोकळ्या वातावरणात नागरिकांची कामे व्यवस्थितपणे मार्गी लागतील मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.आता याला ठेकेदाराची दिरंगाई म्हणावी की संबंधित विभागाचा दुर्लक्षितपणा,हे कळायला मार्गच उरलेला नाही.जर विद्युत मीटरसाठी लाखोंची इमारत बंद पडली असेल तर संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.आता याविषयी काय घडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या