Subscribe Us

header ads

अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली...!

गडचांदूर:- सै.मूम्ताज़ अली. 
     गडचांदूर ते भोयगाव रस्त्याचे काम पूर्णत्वास आले असून अनेक वर्षांपासूनची प्रतिक्षा संपणार आहे.हा मार्ग चंद्रपूर गाठण्यासाठी अगदी सोईस्कर होणार असून भविष्यात वेळ व पैशांची बचत होणार आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून हा मार्ग अत्यंत खराब होता.मोठमोठे खड्डे पडल्याने अपघात होऊन निष्पाप नागरिकांचे नाहक बळी गेले.सदर मार्ग दुरुस्त करावा यासाठी विविध सामाजिक संघटना व विविध पक्षाकडून आंदोलने सुद्धा झाली.अशा विविध प्रकारच्या घडामोडीनंतर अखेर 29 जुलै 2019 रोजी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूरद्वारे,शासनाच्या हायब्रिड कार्यक्रमा अंतर्गत या रस्त्याचे भूमिपूजन होवून कामाला सुरूवात झाली.सध्या परिस्थितीत वाहतुकीसाठी हा मार्ग कमालीचा गुळगुळीत झाला असून भविष्यात यावर नागरिकांची वर्दळ वाढणार यात शंका नाही.मात्र या मार्गावरील भोयगाव येथील पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात दोन,दोन दिवस येथील वाहतूक ठप्प असते.चंद्रपूर जाण्यासाठी राजूरा,बल्लारपूर मार्गे जावे लाघते. त्यामुळे शासनाने सदर पुलाची उंची वाढवावी अशी मागणी आता होवु लागली आहे.
                ---------//-------- 
तेलंगणाकडे जाणारी वाहतूक आता याच मार्गाने जाणार.गडचांदूर परिसरातील विविध सिमेंट कंपन्यांच्या सिमेंट वाहतुकीसाठी तसेच रुग्ण व लोकांना कमी वेळात जिल्हा गाठण्यासाठी हा मार्ग अगदी सोईस्कर होणार आहे.आता फक्त शासनाने त्या पुलाची उंची वाढवावी हीच अपेक्षा.     
        सतिश बिडकर 
      प्रहार जनशक्ती पक्ष
                ---------//-------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या