कोरपना प्रतिनिधी:-
भारतीय सैन्यदलातील भरती प्रक्रियेत बदल करून केंद्रातील भाजप सरकारने नुकतीच "अग्निपथ" योजना जाहिर केली.या योजनेमुळे देशातील तरूणांचे भवितव्य धोक्यात आले आहे.केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात युवकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून,संपूर्ण देशभर "अग्निपथ" च्या विरोधात आंदोलने होत आहे.याच पार्श्वभूमीवर प्रांताध्यक्षांचा आदेशानुसार आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने 27 जून रोजी स्थानिक तहसील कार्यालय जवळ "धरणे आंदोलन" करण्यात येणार आहे.सदर विषय अखील भारतीय काँग्रेस कमिटीने अतिशय गांभीर्याने घेतला असून तालुक्यातील जिल्हापरिषद, पंचायत समिती,नगरपरिषद व ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी,सर्व आघाडी,संघटना,सेल व विभाग तसेच तालुका काँग्रेस,युवक काँग्रेस,महिला काँग्रेस,सेवादल काँग्रेस,अल्पसंख्याक विभाग,अनु.जाती जमाती विभाग,ओ.बी.सी.विभागाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे विनंतीयुक्त आवाहन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या