चंद्रपूर:-
डिजिटल मीडियाच्या वाढत्या प्रमाणामुळे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडियापुढे मोठे आव्हान उभे झाले आहे.डिजिटल मिडिया म्हणजे काय ? डिजिटल मीडिया या नव्या माध्यामातील नवीन माहिती जाणून घेण्यासाठी नुकतीच चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ भवनात डिजिटल मीडियाची कार्यशाळा घेण्यात आली.यावेळी डिजिटल मीडियातील अभ्यासक, पत्रकार तथा डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज़ पोर्टल ग्रिवेंस कॉन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य देवनाथ गंडाटे यांनी मार्गदर्शन केले.चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सदर कार्यशाळेत मजहर अली,बाळू रामटेके,प्रवीण बतकी,आशिष अंबाडे, प्रशांत विघ्नेश्वर,जितेंद्र चोरडिया,ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापण,पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य,विविध वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला.
डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांना रोजगार उपलब्ध आहे.ही संधी गाठण्यासाठी डिजिटल मीडिया नक्की काय आहे ? याची ओळख करून देण्यासाठी भविष्यातील पत्रकारितेवर आधारीत कार्यशाळा घेण्यात आली.गुगल आणि जीमेलचे बहूफायदे,फेसबुक ट्विटरमधील फरक, व्हाट्सएप आणि टेलिग्राम,बिझनेस व्हाट्सएप काय आहे ? नव्या पत्रकारितेत महत्वाचे एप,ऑनलाईन कमाईची साधने यावेळी समजावून सांगण्यात आली. मागील 5,6 वर्षांपासून न्यूज़ पोर्टलच्या माध्यमातून पत्रकारिता रूढ झाली असताना आता मागील 2 वर्षापासून लोकल शॉर्ट व्हिडिओ जर्नालिझम सुरू झाली आहे.त्यात नवीन पत्रकारांना भविष्य असल्याचे देवनाथ गंडाटे यांनी सांगितले.यावेळी सहभागींनी विचारलेल्या शंका आणि विविध प्रश्नांचे निरसण करण्यात आले.प्रास्ताविक प्रशांत विघेश्वर यांनी तर आभार बाळू राममटेके यांनी व्यक्त केले.यावेळी ग्रामीण भागातील पत्रकार बांधवांची उपस्थिती महत्वाची ठरली.आयोजनासाठी राजेश निचकोल, धम्मशिल शेंडे,रोशन वाकडे,देवानंद साखरकर,सुनील बोकडे यांनी मोलाचे सहकार्य केले.हैदर शेख, जितेंद्र जोगड,अनिल देठे,प्रकाश देवगडे,कमलेश सातपुते, विकास मोरेवार,भोजराज गोवर्धन,मंगेश पोटवार सदर कार्यशाळेत सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या