कोरपना प्रतिनिधी:-
"सर्व शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुखांनी आपापले बुथ मजबूत करावे" असे आवाहन कोरपना तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर यांनी कढोली खुर्द येथे भाजपतर्फे आयोजित भोयगाव पंचायत समिती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले. यावेळी गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष तथा विस्तारक सतीश उपलेंचीवार,माजी पं.स. सभापती संजय मुसळे,माजी पं.स.सदस्य नुतनकुमार जिवणे,गडचांदूर न.प.माजी नगरसेवक निलेश ताजने,भाजपा तालुका उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोंगळे,भाजप नेते खुशाल जाधव,भाऊराव पाटील कुळमीथे,प्रमोद वराटे, शक्तीकेंद्र प्रमुख संकुलवार,सुरेश टेकाम आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
हिवरकर यांनी भोयगाव पंचायत समिती क्षेत्राचा आढावा घेतला.या निमित्ताने कढोली सेवा सहकार सोसायटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रामचंद्र पा.वराटे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच शक्तीकेंद्र प्रमुखांना भाजपचे चिन्ह असलेली नावाची तखती(नेमप्लेट)वाटप करून कढोली खुर्द येथील कार्यकारिणी गठीत करण्यात आली. गजानन भोयर शाखा अध्यक्ष,मंगेश हिवरे युवा मोर्चा शाखा अध्यक्ष तसेच महिला आघाडी शाखा अध्यक्षपदी सौ.कविता बंडू देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
उपस्थित मान्यवरांनी सुद्धा आपापले मनोगत व्यक्त करत सविस्तर मार्गदर्शन केले.सदर बैठकीला गावातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते,शक्तीकेंद्र प्रमुख,बुथ प्रमुखांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.संचालन नूतन कुमार जिवने तर आभार साजिद उमरे यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या