कोरपना:-
कोरपना शहरात धुमाकूळ घालणाऱ्या लाल तोंडया दोन माकडांना वनकर्मचार्यानी मोठ्या प्रयत्नाने पकडून चपराळा अभयारण्यात निसर्गमुक्त केले.मागील काही दिवसांपासून कोरपना शहरात लाल तोंडाचे दोन माकड चांगलाच धुडगूस घातला होता,कुणाचेही घरात जाऊन मिळेल ते खाणे,लोकांवर जाऊन पडणे,चावा घेणे यामुळे कोरपनावासी हैराण झाले होते वनकर्मचार्याना याची तक्रार मिळताच उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी अरुणा चौधरी यांचे नेतृत्वात क्षेत्र सहायक निश्चल धात्रक वनरक्षक गजानन बोढे,वनपाल बी के पेंदोर,आर.आर.युनिटचे वनकर्मचारी यांनी पिंजरा लावून मोठ्या प्रयत्नाने अखेर त्या माकडास पिंजऱ्यात अडकविले नंतर त्या माकडाना चपराला अभयारण्यात निसर्गमुक्त वातावरणात मुक्त करण्यात आले.माकडांना पकडल्याने कोरपणावासीय समाधान व्यक्त केले आहे.शहरात आणखी काही लाल तोंडया माकडे आहेत त्यांनाही टप्यटप्याने पकडण्यात येणार आहे.त्या माकडांना कुणीही खाद्यान्न देऊं नका असे आवाहन वन विभागाने केले आहे.
0 टिप्पण्या