Subscribe Us

header ads

घ्या...!आता हे नवीन संकट.सामान्य शेतकर्‍याला 1 लाख 380 चे बील.

जिवती प्रतिनिधी:-
    जिवती महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वीज ग्राहक त्रस्त असून गेल्या अंदाजे 7 ते 8 महिन्यांपासून चुकीची रिडिंग,वाढीव वीज बिले यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.तालुक्यातील अनेक ग्राहकांना अवाच्या सव्वा रकमेची विज बिल येत असून चुकीची रिडिंग, वाढीव बिले,जलद गतीचे वीज मीटर अशा समस्यांना वीज ग्राहकांना सामोरे जावे लागत असून यामुळे वीज ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरल्याचे चित्र आहे.याच पार्श्वभूमीवर जिवती येथील केशवराव भीमू कोटनाके या शेतकर्‍याला एका महिन्याचे वीज बिल चक्क 1 लाख 380 इतके आले.अनेक संकटाचा सामना करीत असलेल्या शेतकर्‍यापुढे हे नवीन संकट उभे ठाकल्याने इतक्या मोठ्याप्रमाणात आलेला वीज बिल पाहून सदर शेतकऱ्याला धक्काच बसला.कुडाचे घर,कुलर,पंखा,फ्रिज इतर वीजेवर चालणारी वस्तू वापरात नाही फक्त दोन बल्ब आहे तरीपण इतके बिल ! वार्षिक उत्पन्न सुद्धा वीज बिल ऐवढे नाही मग आता हे बील भरायचं कसं ? हाच प्रश्न याला पडला आहे. लगेच त्यांनी स्थानिक महावितरण कार्यालय गाठून झालेला प्रकार सांगितला. अधिकाऱ्यांनी त्याला 44 हजार 290 रुपयाचे बिल करून दिल्याची माहिती आहे. 
      चुकीची रिडिंग घेणे,मीटरची रिडिंग न घेणे,मीटर बंद दाखवून अंदाजे बिल आकारून सर्वसामान्यांना त्रास देण्याचा प्रकार याठिकाणी सुरू असल्याचे आरोप होत आहे.अनेकांना 40 हजार,70 हजार,1 लाखाच्या वर बिल आल्याचे कळते.अशाच पद्धतीने दरवेळी वीज बिलाचा फटका सहन करावा लागत असल्याचे बोलले जात आहे.प्रत्येकवेळी अंदाजे बिल काढून हजारो व लाखोंचे बिल देतात ग्राहकांनी कार्यालयात धाव घेतल्यास काही रक्कम कमी करून बील भरण्यास सांगतात आणि जर बिल न भरल्यास मीटर कपात करत असतात,असे प्रकार सुरू आहे. महावितरणाच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत वीज ग्राहकांकडून व्यक्त होत आहे. 
                  ---------//--------
  जुन्या रिडींग प्रमाणे बिल काढण्यात येत आहे.नियमितपणे बिल भरत नसल्याने असे अनेक बिलामध्ये जुन्या रीडिंग प्रमाणे बिल येत आहे.आता आम्ही नियमितपणे मीटरची तपासणी करून रिडिंग बिल देत आहो.
           उप अभियंता एमएसईबी जिवती.
                     ---------//--------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या