गडचांदूर प्रतिनिधी:-
गडचांदूर जवळील अमलनाला डॅमजवळ असलेल्या राजूरा तालुक्यातील नोकारी(बु)येथील संजय कंडलेवार नामक 50 वर्षीय व्यक्ती 10 जुलै रोजी माईन्स येथील नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. शोध मोहीम राबवली असता 13 जूलै रोजी त्याचा मृतदेह अमलनाला डॅम येथे तरंगताना आढळून आला. पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला शासनाकडून 4 लाखंची मदत दिली जाते.असे असताना 19 जुलै रोजी राजूराचे तहसीलदार हरिश गाडे यांनी मयत संजयच्या कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन 4 लाखांचा धनादेश दिला आहे.यावेळी मंडळ अधिकारी साळवे, ईसापूरचे तलाठी वडस्कर,माजी उपसरपंच तुराणकर, राकेश भगत रमेश नैताम यांची उपस्थिती होती. सदर घटनेमुळे संजयचा परिवार दुःखात असताना तहसीलदार,महसूल विभाग कर्मचारी,गडचादूर पोलीस,चंद्रपूर पोलीस शोध पथक,ग्रामवासीयांनी केलेले सहकार्य अमुल्य असून मयत संजयच्या परिवारांने सर्वांचे आभार मानले आहे.
0 टिप्पण्या