कोरपना हबीब शेख:-
स्पर्धेत टिकायचे असेल तर प्रयत्न आणि आत्मविश्वास अत्यंत गरजेचे,आत्मविश्वास हाच यशाचा मार्ग असल्याचे मत माजी आमदार अॕड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.ते नांदा येथे ग्रामदूत फाउंडेशन,कोरपना तालुका प्रेस क्लब,श्री प्रभू रामचंद्र विद्यालय,गुरूकुल महाविद्यालय व अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानद्वारा आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते.या कार्यक्रमाचे उदघाटन माजी पं.स.सभापती संजय मुसळे यांनी केले तर माजी जि.प.सभापती निळकंठ कोरांगे,कामगार नेते साईनाथ बुच्चे,ॲड.दीपक चटप, प्रतीक बोरडे,माजी उपसरपंच पुरुषोत्तम आसवले, शाळेचे संचालक किसन गोंडे,मनोहर झाडे,साईदास रोगे,भास्कर जोगी,सुरेश धोटे,मुरलीधर बोडके,प्राचार्य पोइंकर,रत्नाकर चटप,रत्नाकर बोभाटे,प्रा.अनील मुसळे आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी लंडन देशाची शिष्यवृत्ती मिळविलेल्या अॕड. दीपक चटप व नायब तहसीलदार पदी निवड झालेले प्रतीक बोरडे यांचा सत्कार करण्यात आला.ग्रामीण भागातील शेतकरी पुत्र दीपक चटप आणि प्रतीक बोर्डे यांनी मिळवलेले यश विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत संजय मुसळे यांनी व्यक्त केले.तर विद्यार्थ्यांनी परिस्थितीची तमा न बाळगता जिद्द आणि चिकाटी ठेवून स्पर्धा परीक्षेत प्रयत्न करावे असे मत दीपक चटप यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक अनिल मुसळे,संचालन प्रमोद वाघाडे तर आभार राम रोगे यांनी व्यक्त केले.सदर कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्यासंखेने उपस्थिती होती.
0 टिप्पण्या