Subscribe Us

header ads

बघा हा योगायोग....!

गडचांदूर प्रतिनिधी:- 
         सुफी,संतांची भुमी महाराष्ट्रात आजही हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा कायम आहे.दोन्ही समाज बांधव आपपाले सण साजरे करत असताना एकमेकांच्या सणात मोठ्या आदर व उत्साहाने सामिल होत आहे.काही अपवाद वगळता आजही एकता, भाईचारा,संस्कृती जपत हिंदू-मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने राहत असल्याचे चित्र असून याचा जिवंत उदाहरण 10 जूलै रविवार रोजी कोरपना तालुक्यातील बिबी,नांदा हे गाव.इतर ठिकाणांसह येथील मुस्लिम बांधवांनी सुद्धा रविवार 10 जूलै रोजी ईद-उल-अज़हा(बकरी ईद)मोठ्या हर्षोल्हासात साजरी केली.बघा हा योगायोग याच दिवशी हिंदू बांधवांचे दैवत पंढरपूरातील पांडूरंगाची आषाढी एकादशी सुद्धा होती.एकादशीचा सन्मान ठेवून येथील मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या दिवशी बकऱ्यांची कुर्बानी न देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.फक्त विशेष नमाज पठण करण्यात आली.आणि मंगळवारी 12 जूलै रोजी कुर्बानी करण्यात येणार आहे.
     बिबी व नांदा परिसरात मोठ्यासंख्येने हिंदू-मुस्लिम समाज बांधव राहतात.यंदा आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने येथील मुस्लिम बांधवांनी या सणाचा आदर करून ईदच्या दिवशी कुर्बानी न करता एक दिवसानंतर करण्याचा निर्णय घेतला. वास्तविक पाहता भारत देश हा सर्वधर्मसमभावची शिकवण देणारा व बंधुभाव जोपासणारा देश असून प्रत्येक धर्माचा आदर व समाजात एकतेची भावना व एकामेकांचे विचार जोपासण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.यावेळी नांदा येथील गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष मारोती जमदाडे,प्रकाश उपरे महाराज, हबीब शेख,शकील शेख,अक्रम शेख,अभिषेक उरकुडे, अभय हनुमंते,विनीत निकुरे,साहील मोहीतकर आदींची उपस्थिती होती.मोठा आदर व पावित्र राखून एकादशीला मुस्लिम बांधवांकडून मिळालेला हा सन्मान आदर्श असून सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या निर्णयाचे परिसरात कौतुकास्पद स्वागत होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या