कोरपना प्रतिनिधी:-
कोरपना तालुक्यात गेल्या अंदाजे आठ दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणची शेती व घरांचे नुकसान झाले असून संबंधित विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कोरपना भाजपा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर यांनी केली आहे.हिवरकर हे पाहणी दौराऱ्यावर असताना धानोली तांडा,धानोली या गावाच्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेत पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याचे प्रत्यक्ष अनुभवले.
त्याचप्रमाणे पावसामुळे येथील कित्येक घरांची पडझड झाली असून वर्षभरासाठी घरात साठवून ठेवलेले अन्नधान्य भिजल्याने 'नुपरीत तेरावा महिना' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसामुळे तालुक्यातील गावा गावात मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून तात्काळ शेती व घरांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी हिवरकर यांनी केली आहे.अचानकपणे अनेक घडामोडी घडल्यानंतर महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले.मात्र अजूनही मंत्री मंडळाचा विस्तार न झाल्याने विविध कामांसाठी जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.याच पार्श्वभूमीवर नुकसान भरपाई केव्हा मिळेल ? हे मात्र एक कोडेच बनले आहे.
0 टिप्पण्या