Subscribe Us

header ads

'अती घाई,संकटात नेई'....!

कोरपना प्रतिनिधी:-
कोरपना ते वणी मार्गावरील 'स्टेडियम' जवळ 16 जूलै रोजी रात्री अंदाजे 1 च्या सुमारास अल्टो कार व स्कॉर्पिओ वाहन,या दोघात समोरासमोर धडक झाल्याने एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.घटनेनंतर स्कॉर्पिओ चालक वाहन सोडून फरार झाला आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की, वणीच्या दिशेने कोरपनाकडे येत असलेल्या एका स्कॉर्पिओ चालकाने स्वतःचे वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून कोरपना रोडवरील 'स्टेडियम' जवळ समोरून येणार्‍या एका अल्टो कार क्रं.GJ-10AC-5734 ला जोरदार धडक दिली.यामध्ये अल्टो चालक कोरपना येथील स्वप्निल संदेश ईटनकर वयवर्ष 22 व बल्लारशाह येथील मधू खोडे वयवर्ष 50 हे गंभीररित्या जखमी झाले.
चालक स्कॉर्पिओ क्रं.MH 38/4383 घटनास्थळी सोडून फरार झाला असून शोध सुरू आहे.पोलीसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत सदर जखमींना ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे भरती केले. वैद्यकीय अधिकारी यांनी जखमी स्वप्निल ईटनकर यांना उपचारा दरम्यान मृत घोषित केले.फरार स्कॉर्पिओ चालक विरोधात कोरपना येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या