Subscribe Us

header ads

देव तारी,त्याला कोण मारी....!

गडचांदूर प्रतिनिधी:- 
       कोरपना तालुक्यातील नांदा गावातील नाला ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात एका शेतकऱ्याची बैलबंडी पलटी झाली.गेल्या आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरू असल्याने शेताची पाहणी सोबतच फवारणी व इतर कामासाठी तो शेतकरी नाला पार करून शेतात जात असतानाच ही घटना घडली.सदर घटना 17 जुलै रोजी सकाळी अंदाजे 11 च्या सुमारास घडली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.आपापले जीव वाचवण्यासासाठी बंडीत बसलेले कसेबसे पाण्यातून बाहेर आले.
पण तेज पाण्याच्या प्रवाहात बळीराजाचे सर्जा, राजा वाहणार असल्याच्या भीतीने तो त्यांना वाचवण्यासाठी धडपडत होता.शेतकर्‍याची ही अवस्था पाहून त्याठिकाणी असलेल्यांचे मन सुन्न झाले,अक्षरशा: हृदयाचा ठोका चुकवणारे ते दृश्य होते.अखेर मोठ्या परिश्रमाने बंडीसह सर्जा,राजाला बाहेर काढण्यात यश आले.कृषी प्रधान भारत देशाचे हे विदारक चित्र असून स्वतंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर ही बळीराजाला शेतात जायला व्यवस्थित रस्ता उपलब्ध नसून जनता मुलभूत सुविधांपासून वंचित आहे.याला शोकांतिकाच म्हणावी लागेल.
केवळ निवडणूकी पुरताच नेते मंडळींना शेतकऱ्यांचा कळवळा असतो,आम्ही तुमचे किती हितचिंतक व कैवारी आहोत हे दाखवतात.नंतर मात्र इकडे ढुंकुनही पाहत नाही.एकीकडे स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे तर दुसरीकडे आजही कित्येक ठिकाणी नागरिकांपर्यंत मुलभूत सुविधा पोहोचली नाही.याला विकासाच्या बाता मारणाऱ्यांना चपराकच म्हणावी लागेल अशी जळजळीत भावना व्यक्त होताना दिसली.'जर एक महिना पगार उशीरा झाला तर जीव कासावीस होतो.
मग कर्ज काढून,पैसा पाण्यात टाकून जर हाती काहीच लागत नसलेल्या बळीराजाच्या जीवाला काय वाटत असेल' ही बाब विचारणीय असून बैल बुडाले असते तर त्या शेतकऱ्याची काय अवस्था झाली असती,याचा विचार केला तरी अंगावर शहारे येतात.लोकप्रतिधिंनी याकडे जातीने लक्ष देऊन लवकरात लवकर याठिकाणी पुलाची निर्मिती करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. 
                   -----------//---------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या