Subscribe Us

header ads

गडचांदूर व्यापारी असोसिएशनतर्फे GST चा निषेध.

गडचांदूर:-
         शासनाने दही,लस्सी,बटर,किराणासह इतर जीवनावश्यक वस्तूंवर GST लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.अगोदरच महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले,बेरोजगारी वाढली,जनता आर्थिक अडचणीत असताना पुन्हा महागाईकडे नेणारा हा निर्णय सर्वसामान्य गोरगरीबांना परवडणारा नसल्याने शासनाने लावलेला GST रद्द करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी गडचांदूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी,सचिव प्रशांत गौरशेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या