Subscribe Us

header ads

धो-धो झोडपले पावसाने,पिकांची नासाडी.

कोरपना प्रतिनिधी:-
    कोरपना तालुक्यात परवा रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने पिकाची नासाडी झाली आहे.कोरपना पंचकोशीतील पकडीगुड्डम जलाशयाचे पाणी पहिल्यांदाच दीड मीटर पेक्षा अधिक उंचीने सांडव्यावरून गेल्याने काठावरील गावांच्या शेजारी संपूर्ण नाले,ओढे दोन्ही थड्या भरून वाहू लागले आहे.
धानोली तांडा येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने जवळपास 3 तास वाहतूक ठप्प झाली होती. पकडीगुड्डम जलाशयातील माशांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून मासेमारीचे लाकडी डोंगे,जाळ्या मत्स्यबिज व मासोळ्या वाहून गेल्याने मासेमारांचे मोठे नुकसान झाले आहे.रात्री झालेल्या पावसाने अनेक कच्च्या घरांची पडझड तसेच शेतात पाणी शिरुन शेतकऱ्यांच्या शेत पिकांची हानी झाली असून अतिवृष्टीचा फटका धानोली, कुसळ,माथा,शेरज या काठावरील गावांच्या अनेक शेतकऱ्यांना बसला आहे. तातडीने पंचनामे करून दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या