Subscribe Us

header ads

द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती पदावर विराजमान....!

गडचांदूर,कोरपना:- 
आदिवासी समाजाच्या महिला द्रौपदी मुर्मू यांची स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर निवड झाल्याबद्दल कोरपना येथे बस  स्टँड जवळ भाजपा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर आणि गडचांदूर येथे संविधान चौकात भाजपा शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या वतीने आतिषबाजी व एकमेकांना पेढे चारून विजय उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. 
संविधानाचा आदर करणारा भाजप हा एकमेव राजकीय पक्ष असून देशातील प्रत्येक घटकांच्या उन्नतीसाठी भाजपाने निरंतर संविधानीक पध्दतीने कार्य केले आहे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या महिला द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदासाठी निवड करून त्यांना सर्वोच्च पदावर विराजमान करण्यात मोलाचे कार्य केले आहे.राष्ट्रपती मुर्मूंचा हा विजय केवळ आदिवासी समाजाचा सन्मान वाढवणारा नसून तो देशाचा व अखिल भारतीय स्तरावरील सर्व जाती,धर्म,पंथांचा सन्मान वाढवणारा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
                ------------//---------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या