राजूरा:-
इन्फंट जिझस इंग्लिश स्कूल राजूरा,या शाळेतून शिक्षणाचे धडे घेतलेल्या काही माजी विद्यार्थ्यांनी अंदाजे 33,34 वर्षांनंतर पुर्वीचे विद्यार्थी मित्र व सर्व शिक्षकांना एकत्रित करून एक भेट समारंभाचे आयोजन केले.यामध्ये शाळेचे संस्थापक ई.एम.डेविड व त्यांच्या पत्नी मेरी मॅडम यांच्यासह सर्व माजी शिक्षक,शिक्षिकांचा शाल,श्रीफळ देऊन आदरपूर्वक सत्कार करण्यात आला.विशेषत: त्यावेळच्या चंदू नावाने ओळखले जाणारे चपराशी 'चंद्रशेखर बोरकर' यांनाही माजी विद्यार्थ्यांनी आमंत्रित केले होते.त्यांनाही आदरपूर्वक मंचावर बोलावून पुष्पगुच्छ,शाल देऊन सत्कार करण्यात आला. कंबरेच्या हाडाला गंभीर स्वरूपाची दुखापत असताना सुद्धा चंदू यांनी आपल्या या माजी विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देत सर्वांची भेट घेण्यासाठी उत्साहाने हजेरी लावली.आयोजक विद्यार्थ्यांनी मंचावर त्याच्या हाताने शाळेची घंटी वाजवून त्या काळातील जुन्या आठवणींना जीवंत केले. उतरते वय आणि अशक्तापणाने चालणे कठीण झालेल्या चंदूला घंटी वाजवताना अनुभवलेला तो क्षण सगळ्यांच्या मनाला भारावून जाणारा ठरला हे मात्र विशेष.
विद्यार्थ्यांनी आधीच चंदू आणि त्यांच्या पत्नीसाठी नवीन कपड्यांची व्यवस्था करून 3 हजाराची अन्नाची किट उपहार स्वरूपात दिली.मावळत्या वयामुळे चंदूच्या शारिरीक शक्तीसह आर्थिक परिस्थिती सुद्धा हलाखीची असल्याचे लक्षात घेता काही विद्यार्थ्यांनी त्याच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत करण्याचे ठरवले त्याचबरोबर कार्यक्रमात उपस्थित सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना चंदूला आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.या शुभ कार्यासाठी शिक्षक मसूद अहेमद,दीलीप सदावर्ते यांनी सर्वप्रथम काही आर्थिक मदत केली.बघता बघता चंदूच्या मदतीला शिक्षक,विद्यार्थ्यांचे हात सरसावल्याने जवळपास 80 हजारांची रक्कम जमा झाली. त्यातील 5 हजार रोख रक्कम त्याला घरी जाऊन देण्यात आली आणि उर्वरित 75 हजार त्याच्या नावाने एफ.डी.करून दिली. विद्यार्थ्यांच्या आवाहनावर अनेक विद्यार्थ्यांसह शाळेचे माजी मुख्याध्यापक मसूद अहमद,दिलीप सदावर्ते, सुरज सर,अशोक मेडपल्लिवार,डॉ.सत्यवान काटकर, संध्या पाटील,सरोज लेखराजनी,ज्योत्स्ना चव्हाण, स्वाती देशपांडे,नंदा आमीडवार आदी शिक्षकांनी पुढे येऊन आर्थिक मदत केली. बजाज बंधू,धनराज सिंह शेखावत,हरभजन सिंह,हितेश डाखरे,भैय्या दासरी, लक्ष्मण गुप्ता,उपेंद्र गुप्ता,पि.सी.नवीन,प्रफुल जूनघरे, गुलिंदर कौर,सुधीर नथानी आदींची चंदूला आर्थिक मदत मिळावी यासाठी विशेष भूमिका होती.मानवहित व संबंध जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कार्याची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच.फक्त जुन्या आठवणीला उजाळा देण्यापुर्तेच मर्यादित न राहता आपण समाजासाठी काही देणे लागतो या उदात्त भावनेने मानव हित जोपासणाऱ्या माजी शिक्षक,शिक्षिका व विद्यार्थ्यांच्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
---------//--------
(कोरपना LIVE)
'मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली'
0 टिप्पण्या