Subscribe Us

header ads

विद्यार्थी प्रतिनिधीसाठी शाळेने राबवली प्रत्यक्ष मतदान पद्धती.

गडचांदूर प्रतिनिधी:- 
     कोरपणा तालुक्यातील श्री शिवाजी इंग्लिश स्कूल अँड जुनियर कॉलेज नांदाफाटा येथे नुकतीच विद्यार्थी प्रतिनिधीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.गुप्त मतदान पद्धतीने सदर निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली असून यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधीसाठी 22 विद्यार्थी उमेदवार म्हणून उभे होते.जवळपास 8 वी ते 12 वी पर्यंतच्या 7 शे विद्यार्थ्यांनी गुप्त मतदान पद्धतीने मतदान केले.
सदर प्रक्रिया राबवण्यासाठी मतदान अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची शाळेमार्फत नियुक्ती करण्यात आली. मतदानासाठी लागणारे सर्व साहित्य शाळेने उपलब्ध करून दिले.जवळपास 8 दिवसापासून आपल्या उमेदवाराला अधिक मतदान व्हावे यासाठी विद्यार्थ्यांनी प्रचार केला.
     सदर प्रक्रिया राबवण्यासाठी शाळेचे अध्यक्ष शामसुंदर राऊत,व्यवस्थापक रवींद्र लालजी श्रीवास्तव, सचिव पौर्णिमा श्रीवास्तव तथा शाळेच्या प्राचार्या अलेक्झांडरीना,उपप्राचार्य रत्नाकर चटप,मतदान अधिकारी किरण कुंडू, केदार उरकुडे,पल्लभ शाहा, मनीषा भट्टड, गजानन जगनाडे,अर्चना धारसकर, सचिन सातपुते,इंद्रपाल बुरांडे,प्रशांत उपरे आदींनी परिश्रम घेतले.याचबरोबर विजयी उमेदवारांसाठी स्वतंत्र मंत्रीमंडळ तयार करण्यात येणार असून विविध खाते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या