Subscribe Us

header ads

'ओबीसी' राजकीय आरक्षण....!

गडचांदूर:-
            अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नुकतेच राजूरा विधानसभा क्षेत्रात आले होते. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हे आरक्षण कायम रहावे किंवा सर्वसाधारण जागेवर ओबीसींना संधी मिळावी,यासाठी प्रयत्न करून आपल्या आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी काँग्रेस ओबीसी आघाडी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढाई व इतरांनी यानिमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदनातून केली आहे.राज्यात नगरपंचायत,नगरपरिषद,नगरपालिका,
महानगरपालिका,जिल्हापरिषद,पंचायत समिती अशा विविध निवडणूकांचे बिगुल वाजले असताना ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवणे आवश्यक आहे.त्यासाठी ओबीसींची बाजू माननीय सुप्रीम कोर्टात भक्कमपणे मांडून आरक्षण कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे किंवा ज्या सर्वसाधारण गटासाठी आरक्षित जागा आहे त्यात ओबीसींना जास्तीत जास्त वाटा मिळावा यासाठी प्रयत्न करण्याची मागणी ओबीसी बांधवांची आहे.ओबीसींना न्याय मिळावा यासाठी आपण स्वतः अनेकदा संघर्षरत असून याच पार्श्वभूमीवर आपल्या व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ओबीसींना न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष वांढरे सह माजी नगराध्यक्ष अरूण धोटे, जेष्ठ नेते विजय बावणे,दादा पा.लांडे,गडचांदूर न.प. गटनेेते तथा नगरसेेवक विक्रम येरणे,प्रा.आशिष देरकर,उमेश राजूरकर,कुंदाताई जेनेकर,मंगेश गुरनुले, दौलत भोंगळे,अॕड.अरूण धोटे, एडी एकरे,निलेश संगमवार इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
                   ---------//-------
                                  'कोरपना LIVE'
                                     मुख्यसंपादक
                                   सै.मूम्ताज़ अली.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या