घुग्घुस प्रतिनिधी:-
भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून भाजप परीवारातील प्रत्येक कार्यकर्ता हा जनसेवेसाठी नेहमी तत्पर असतो.येथील नव्या कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे निश्चितच स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढली आहे.पुढील काळात घुग्घुस शहरात भारतीय जनता पार्टीचा विचार तसेच लोकनेते आ. सुधीर मुनगंटीवार यांची विकासकामे,सेवा उपक्रम जनमानसापर्यंत अधीक जोमाने पोहचविण्यासाठी ही सर्व मंडळी अविरत काम करतील याचा मला विश्वास आहे.असे प्रतिपादन माजी जिल्हापरिषद अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.ते घुग्घुस येथील आ.सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रात कामगार नेते सचिन कोंडावार यांच्या नेतृत्वात घुग्घुस शहरातील 25 कामगार बांधवांच्या भाजपात प्रवेश कार्यक्रमात बोलत होते.याप्रसंगी भोंगळे यांनी कामगार नेते सचिन कोंडावार व त्यांच्या सहकाऱ्यांना पक्षाचे दुपट्टा घालून स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कामगार नेते कोंडावार यांची भाजपा कामगार आघाडी,घुग्घुस शहर कार्याध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वात केंद्र सरकारने कामगारांचे हित लक्षात घेऊन आखलेल्या विविध योजना,गोरगरिब,कष्टकरी कामगारांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून भाजपने वेळोवेळी केलेली मदत व सहकार्यामुळे आम्ही भाजपात प्रवेश करीत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्यासंखेने उपस्थिती होती.
0 टिप्पण्या