गडचांदूर:-
गडचांदूर जवळ थुटरा शेत शिवारातील रामदास पाटील आवंडे यांच्या शेतात काम करत असताना वीज कोसळल्याने रोजनदारासह एका बैलाचा जागीच मृत्यू झाला.पाडूरंग वाघू धुळे वयवर्ष अंदाजे 60 रा. लखमापूर असे मृतकाचे नाव असून तो आवंडे यांच्या शेतात रोजनदारीने कामावर होता.त्याच्या पश्चात लखमापूर येथे पत्नी दोन मुले असून या घटनेने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले तर गावात शोककळा पसरली आहे.घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीस स्टेशनचे सपोनि प्रमोद शिंदे पोलीसांना घेऊन घटनास्थळी पोहोचले.पटवारी प्रदीप जाधव व पोलीसांनी पंचनामा करून शव शवविच्छेदनासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालय येथे पाठवले.सदर मृत व्यक्तीच्या परिवाराला शासनातर्फे आर्थिक मदत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
-------//-----
कोरपना LIVE
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली
0 टिप्पण्या