Subscribe Us

header ads

भाजप सरकारकडून 'ईडी' चा गैरवापर,काँग्रेस आक्रमक.

कोरपना:-
     काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना केंद्रातील भाजपचे मोदी सरकार राजकीय सुडबुध्दीने लक्ष करीत असल्याचे संपूर्ण देश पहत आहे.भाजप सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय व धोरण यावरून सर्वसामान्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेस नेत्यांना नाहक त्रास दिला जात आहे.हे हुकुमशाही सरकार केंद्रीय तपास यंत्रणा(ईडी)चा गैरवापर करत असल्याचा विरोध करत या हुकुमशाही सरकारचा निषेध करण्यासाठी कोरपना काॅंग्रेसच्या वतीने बस स्थानक चौक येथे आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्व शांततापूर्ण सत्याग्रह आंदोलन करण्यात आला.
               यावेळी तालुका अध्यक्ष विठ्ठलराव थीपे, सीडीसीसी बँक संचालक विजय बावणे,माजी जि.प. सदस्य उत्तमराव पेचे,माजी पं.स.पसभापती श्याम रणदिवे,माजी सभापती संभाजी कोवे,माजी जि.प. सदस्य सिताराम कोडापे,सुरेश पा.मालेकार,न.पं. उपाध्यक्ष इस्माईल भाई,नगरसेक मनोहर चन्ने,निसार भाई,शैलेश लोखंडे,उमेश राजूकर,गणेश गोडे,घनशाम नांदेकर,अनिल गोंडे,संजय जाधव,रोशन आस्वले, रोशन मारापे,इरफान भाई,मिलिंद ताकसांडे,विलास मडावी,भगवान हरबडे,तुळशीराम भोंगळे इत्यादींसह काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्यासंखेने उपस्थिती होती.
                    ---------//-------
                             'कोरपना LIVE'
                                 मुख्यसंपादक
                               सै.मूम्ताज़ अली.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या