चिमूर प्रतिनिधी:-
क्रांतीभुमी चिमूर हे शहर उमा नदीच्या तिरावर असून पिण्यासाठी याच नदीचा पाणी वापरले जाते. नगरपरिषदेमार्फत या नदी पात्रात डंपिंग यार्ड तयार करण्यात आले.यामुळे दुर्गंधी पसरली असून पात्र प्रदूषित झाल्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.ही बाब लक्षात घेता येत्या 7 दिवसात सदर डंपिंग यार्ड हटविण्यात यावे अन्यथा चिमूर तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.शहरातील दुर्गंधी रोखण्यासाठी नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी खरकाडा येथे डंपिंग यार्डसाठी जागा खरेदी करून शहरातील कचरा त्याठिकाणी टाकला जात आहे.तरीपण जुन्याच जागेवर कचऱ्यासोबच मेलेली जनावरे,बकऱ्याचा मास टाकला जात असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.या दुर्गंधीमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहे. यामार्गावरून जाताना ताडोबा पर्यटकांना ही दुर्गंधीचा सामना करावा लागत असून याच डंपिंग यार्डवर विविध जनावरे,डुकरांनी बसतान मांडल्याचे चित्र आहे.नगरपरिषद प्रशासनाने लवकरात लवकर याठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना दिलासा द्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.
--------//-------
0 टिप्पण्या