चिमूर प्रतिनिधी:-
लोक कल्याण शिक्षण मंडळ नेरीद्वारा संचालित जनता विद्यालयाची विद्यार्थीनी कु. प्रणाली जगदीश झोडे हिने नवोदयच्या परिक्षेत उकृष्ठ कामगिरी बजावत नवोदय विद्यालयात प्रवेश सुनिश्चित केला.वर्ष 2022,23 च्या सत्रा करीता तीची निवड करण्यात आली आहे.तीच्या या कामगिरीने ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थी सुद्धा गुणवत्ता यादीत येऊ शकतात हे सिद्ध करून दाखवले.प्रणालीच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिने या यशाचे श्रेय मुख्याध्यापक एस.एन.येरणे शाळेतील सर्व शिक्षक पालक आजोबा यांना दिले आहे.शाळेत तिचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
0 टिप्पण्या