Subscribe Us

header ads

कोलामगुडा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय सामुग्री वितरीत.

राजूरा प्रतिनिधी:- 
 राजूरा तालुक्यातील मूर्ती गावा जवळील जंगलव्याप्त, कोलाम वस्ती असलेल्या कोलामगुडा जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत राजूरा मित्र मंडळातर्फे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व इतर शालेय सामुग्री वितरीत करण्यात आली.यावेळी गाव पाटील भिमराव कुमरे,बि.यू.बोर्डेवार,एजाज़ अहेमद,गणेश बेले,सुरेश साळवे,फारूख शेख यांची उपस्थिती होती. शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करीत शाळेच्या कारभारा विषयी सविस्तर माहिती दिली.मुलांच्या भावनांना जपुन त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे कार्य करावे लागते.मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती बघता त्यांना शैक्षणिक बाबतीत सहकार्याची गरज भासते.राजूरा मित्र मंडळाने सहकार्य केल्याबद्दल मुख्याध्यापिका होरे यांनी आभार मानले.विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या