Subscribe Us

header ads

वनविभागाची कारवाई....!

राजूरा प्रतिनिधी:- 
     वन्यजीव असलेल्या चितळ व घोरपडीची शिकार करून मांसाची विल्हेवाट लावल्या प्रकरणी राजूरा वनविभागाने चुनाळा येथील 2,बामनवाडा आणि राजूरा येथील प्रत्येकी 2 अशा एकूण 4 जणांना मुद्देमालासह अटक करून त्यांच्यावर वन कायदांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.7 जूलै रोजी सायंकाळच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी यांना चितळाची शिकार करून मांसाची विल्हेवाट लावणे सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली.लगेच यांनी कर्मचाऱ्यांसह सापळा रचून धाड टाकली.प्रथम चुनाळा येथील एकाच्या घरी मास शिजविण्याची तयारी सुरू असताना त्याला रंगेहात पकडून त्याच्याकडून इतर सहभागी आरोपींची माहिती घेतली व चुनाळा,बामनवाडा आणि राजूरा येथील बेघरवस्ती वॉर्डातील आरोपींना ताब्यात घेतले.चितळ आणि घोरपडीचे मांस,कुऱ्हाड,विळा जप्त करून यासर्व आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू,उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड,क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते,नरेंद्र देशकर,वनरक्षक देवानंद शेंडे,सुनील गजलवार,सुनील मेश्राम, संजीव सुरवसे,अर्जुन पोले, सायस हाके,सुलभा उरकुडे,वनमजूर गंगाधर मोहितकर,मयूर आत्राम,मंगल पाचभाई यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या