Subscribe Us

header ads

वेस्टवेअरचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांना सतर्कतेचा इशारा.

गडचांदूर प्रतिनिधी:-
  गडचांदूर पोलीस ठाणेंतर्गत येणाऱ्या अमलनाला डॅम पावसाळ्यात भरल्यानंतर त्याठिकाणी असलेल्या वेस्टवेअर वरून छमछम पडत असलेल्या पाण्याचे मनमोहक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी व आनंद लुटण्यासाठी दरवर्षी दुरदुरून मोठ्यासंखेने पर्यटक याठिकाणी येत असतात. निसर्गरम्य डॅम परिसारात विराजमान वेस्टवेअर पर्यटकांना साद घालत मंत्रमुग्ध करीत असल्याने याठिकाणी पर्यटकांची तोबा गर्दी असते.काही जण परिवारासह या ठिकाणचा मनसोक्त आनंद घेतात तर काही अती उत्साही पर्यटक मनाई केलेल्या ठिकाणी उड्या मारून जीव गमवत असल्याची घटना मागील काळात घडली आहे. उदाहरणार्थ गेल्यावर्षी वेस्टवेअर पाहण्यासाठी चंद्रपूर, बल्लारशा,राजूरा वरून आलेल्या तीन युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता.भविष्यात या हृदयविदारक घटनेची पुनरावृत्ती होऊ नये या उद्देशाने डॅम भरण्यापूर्वी गडचांदूर पोलीस अलर्ट झाली असून ठाणेदार सत्यजित आमले यांनी पाटबंधारे विभागाचे अभियंता सैय्यद,घुग्घुस येथील जनहितेशी समाजीक कार्यकर्ते ईबादुल्ल सिदिकी,पत्रकार सैय्यद मूम्ताज़ अली,मयुर एकरे,एजाज़ भाई इतर पत्रकारांसह सदर वेस्टवेअर ठिकाणची पाहणी केली.वेस्टवेअरच्या पाण्याच्या प्रवाहातील धोकादायक खड्डे जलसिंचन विभागाकडून भरण्यात आले आहे.सध्याच्या परिस्थितीत डॅम अजून भरला नसून डॅम भरल्यानंतर येथे येणाऱ्या पर्यटकांनी खोल पाण्यात जाऊ नये तसेच नशापाणी करू नये,याठिकाणी स्वच्छता ठेवावी असे आवाहन करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करू नये.नियम मोडताना जर कुणी आढळला तर त्याच्या विरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.पर्यटकांच्या आनंदावर विरजण टाकणे,हा आमचा हेतू नसून फक्त अप्रिय घटनांवर आळा घालण्याचा प्रयत्न असून गेल्यावर्षाच्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये हिच ईश्वर चरणी प्रार्थना, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या