गडचांदूर :-
कोरपना तालुक्यातील मौजा पालगाव ते अल्ट्राटेक सिमेंट कंपनीपर्यंत रस्त्याच्या निर्मितीसाठी गावकर्यांनी अल्ट्राटेक कंपनीच्या प्रशासन भवना समोर धरणे आंदोलन केले.मागील 30 वर्षापासून पालगाव ते कंपनी पर्यंत कच्चा रस्ता असल्याने हा रस्ता सीमेंट काँक्रिटीकरण करावे अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.रस्त्या लगतच अल्ट्राटेक सिमेंट कंपनीची खदान आहे.रस्ता कच्चा असल्याने गावकऱ्यांना पावसाळ्यात खड्डे आणि चिखलाचा सामना करत ये-जा करावी लागत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीकडे कंपनी प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकऱ्यांकडून होत आहे.
कंपनी प्रशासनाला वारंवार सांगून,निवेदने देऊनही यासंदर्भात काहीच दखल घेतली जात नसल्याचे पाहून अखेर गावकऱ्यांचा संयम सुटला आणि महिला,पुरुष, लहानमोठे विद्यार्थ्यांनी कंपनी प्रशासनच्या प्रशासकीय इमारती पुढे धरणे आंदोलन केले.साधारणतः 2 ते 3 किमी अंतरावर असलेला हा रस्ता नांदाफाटा औद्योगिक वसाहतीला जोडणारा असून बँक,पोस्ट ऑफिस,शाळा,महाविद्यालय व गडचांदूर शहराकडे जाण्यासाठी गावकरी याच रस्त्याचा वापर करतात. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून प्रवास करणे जीवघेणा ठरत असून मोठेमोठे खड्डे मृत्यूला आमंत्रण देत आहे. सोबतच रस्त्याच्या बाजू असलेल्या खदानीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकरी,कामगार,विद्यार्थांचे मोठ्याप्रमाणात हाल होत असून सदर गाव कंपनी अंतर्गत दत्तक आहे.या गावापर्यंत सिमेंट रस्ता बनवून द्यावा अशी मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली आहे.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गडचांदूर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली असता पोलीस त्याठिकाणी पोहोचले.
यासंदर्भात कंपनी प्रशासनाशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी गावच्या सरपंचा अलका पायपरे,नरेंद्र मडावी,ग्रा.पं.सदस्य अनिल आत्राम,विमल गेडाम, ज्योती कुंभारे,गौतम खोब्रागडे,अतुल निमसटकार, विठ्ठल मावलीकर,कवडू गेडाम यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे,नापोशि धर्मराज मुंडे,सुषमा अडकीने यांची उपस्थिती होती.कंपनी प्रशासनाचे कर्नल डे,मिश्रा,सचिन गोवरदिपे यांच्या सोबत चर्चा केली असता तात्काळ रस्त्याचे खड्डे बुजवून खडीकरण करून देण्यात येईल व त्यांनतर गावकऱ्यांच्या प्रतिनिधीला सोबत घेऊन बैठक घेण्यात येईल,स्थायी स्वरूपाचा सिमेंट काँक्रीट मजबूत रस्ता करण्यात येईल,तसेच रस्त्याच्या बाजूला लाईटची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. कंपनीनी दिलेल्या आश्वासनाची माहिती शिष्टमंडळाने गावकऱ्यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आला. आंदोलनानंतर सरपंच अलका पायपरे यांच्या अध्यक्षतेखाली गावात ग्रामससभा घेऊन गावाऱ्यांना यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आल्याचे कळते.
------//------
"कोरपना LIVE"
'सै.मूम्ताज़ अली'
0 टिप्पण्या