Subscribe Us

header ads

गडचांदूर पोलिसांची कारवाई...!

गडचांदूर प्रतिनिधी:- 
        चोरी,घरफोडी यासारखे गुन्हे करणारा कुख्यात, सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार गडचांदूर वार्ड क्रमांक 4 येथील संतोष उर्फ बल्ली अंजू दुर्गे वयवर्ष 29 हा मागील काही दिवसांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह,चंद्रपूर शहर,मूल इत्यादी ठिकाणी चोरी, घरफोडी सारखे गुन्हे करून फरार होता.दरम्यान सदर गुन्हेगार गडचांदूर येथे असल्याची गुप्त माहिती गडचांदूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्परतेने सदर गुन्हेगाराला 2 जूलै रोजी रात्रीच्या सुमारास येथील वार्ड क्रमांक 4,मुक्तीधाम परिसरातून ताब्यात घेतले.त्यावेळी त्याच्या जवळ एक धारदार चाकू अवैधरीत्या मिळुन आला.पोलिसांनी पंचनामा करून त्याच्या विरूद्ध भारतीय हत्यार कायदा अन्वय गुन्हा दाखल करून एक बाईकसह अटक केली.पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे 3 गुन्हे,पोलीस स्टेशन बल्लारशाह,मूल येथे चोरी, घरफोडी केल्याची कबूली सदर आरोपीने गडचांदूर पोलिसांना चौकशी दरम्यान दिली असून त्याच्या कडून पुन्हा चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे,अपर पोलीस अधिक्षक शेखर देशमुख, गडचांदूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सत्यजित आमले,सपोनी प्रमोद शिंदे,नपोशि धर्मराज मुंडे,पोशि विजय कोटनाके,तिरूपती माने,संदीप थेरे,प्रभू मामीलवाड, महेश चव्हाण यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या