Subscribe Us

header ads

यशासाठी सातत्याने चिकाटी आवश्यक. "तहसीलदार प्राजक्ता बुरांडे"

चिमूर प्रतिनिधी:- 
     शहरी भागातील पुढारलेल्या शाळांमधूनच यश प्राप्त करता येते,हा समज चुकीचा असून ग्रामीण परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी सुद्धा जिद्द, परिश्रम,चिकाटी आणि सातत्य राखून अभ्यास केल्यास यश मिळवता येते.याचा परिपाठ आपल्या शाळेची विद्यार्थिनी वैष्णवी हीने घालून दिल्याचे गौरवोदगार चिमूर येथील तहसीलदार प्राजक्ता बुरांडे (रेळेकर)यांनी काढले.चिमूर तालुक्यात नेरी येथील सरस्वती कन्या विद्यालयातील विद्यार्थीनी कु.वैष्णवी अरविंद चौधरी हीने मॅट्रिकच्या परीक्षेत 94.80 गुण प्राप्त करून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.या निमित्ताने 6 जूलै रोजी चिमूरच्या तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी तहसील कार्यालयात त्याचा शाल,पुष्पगुच्छ व रोपटे(वृक्ष)देऊन सत्कार केला.सोबतच तीचे वडील अरविंद चौधरी व शिक्षक सुनील पोहनकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला आहे.जिद्द व चिकाटीचा भरवशावर एका शेतकरी परिवारातील वैष्णवीने परिक्षेत यश प्राप्त केल्याने त्याचा विविध स्तरांतून कौतुक होत असून भविष्यातील वाटचालीसाठी वैष्णवीला शुभेच्छा देण्यात आल्या आहे.यावेळी निरीक्षण अधिकारी आशिष फुलके,नायब तहसीलदार तुळशिदास कोवे तथा महसुल कर्मचारी व इतरांची उपस्थिती होती. कार्यकमाचे संचालन सूरज तिडके यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या