Subscribe Us

header ads

गुड मॉर्निंग ग्रुपतर्फे 'चेव्हनिंग ग्लोबल लिडर' चा सत्कार.

गडचांदूर प्रतिनिधी:-
     ॲड.दीपक यादवराव चटप हा तरूण वकील ब्रिटिश सरकारचा 'चेव्हनिंग ग्लोबल लिडर' ठरला असून तो ब्रिटीश सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या 'चेव्हनिंग' या जागतिक प्रतिष्ठेच्या 45 लाखांची शिष्यवृत्तीचा मानकरी ठरला आहे. दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबातील वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी शिष्यवृत्ती मिळवणारा दीपक हा देशातील पहिला तरूण वकील ठरला आहे.सामाजिक नेतृत्व करू इच्छिणाऱ्या जगभरातील युवकांना ब्रिटिश सरकार ही शिष्यवृत्ती देते.लंडनच्या 'सोएस' या जगातील सर्वोत्तम विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी दीपकची निवड झाली असून त्याच्या शिक्षणाचा संपुर्ण खर्च ब्रिटीश सरकार उचलणार आहे.सातासमुद्रपार गावाचा नाव लौकिक करणार्‍या दीपकवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असताना गुड मॉर्निंग ग्रुप गडचांदूरचे मारोती लोखंडे सर,आनंदराव चटप,प्रा.डॉ.हेमचंद दुधगगवळी,प्राचार्य पाचभाई,खसपूरे सर,ठोंबरे सर, गोखरे सर,पारेकर सर,माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष पटकोटवार,पुरुषोत्तम जोगी,रमेश अंबोरे यांनीही दीपकचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व भविष्यातील वाटचालीबद्दल मनापासून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या