Subscribe Us

header ads

'अखेर...!तो सापडला'

गडचांदूर प्रतिनिधी:-
कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराच्या जवळील अमलनाला डॅमजवळ नोकारी गावातील 50 वर्षीय व्यक्ती संजय राजाराम कंडलेवार 10 जुलै रोजी सकाळी अंदाजे 9 च्या सुमारास राजूरा तालुक्यातील नोकारी बु.(माईन्स)नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. नाल्याच्या दोन्ही बाजू,अमलनाला डॅम पर्यंत व डॅम मध्ये याचा शोध घेण्यात आला पण कुठेच आढळून आला नव्हता.
11 जूलै रोजी शोध घेण्यासाठी चंद्रपूर येथील पोलीस विभागाचे शोध पथक दाखल होऊन शोध मोहिम सुरू केली मात्र तोही अपयशी ठरले.संततधार पावसामुळे वाढता पुराचा प्रमाण शोध मोहिमेत अडथळा ठरला.अखेर चौथ्या दिवशी 13 जूलै रोजी दुपारी अंदाजे 12 च्या दरम्यान अमलनाला धरण शंकर मंदिरा समोर मासेमारी करणाऱ्यांना संजयचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.याची माहिती पोलीस व नातेवाईकांना देण्यात आली आणि हे सर्व घटनास्थळी पोहोचले.गडचांदूर पोलीस स्टेशनचे नापोशि धर्मराज मुंडे,ग्रामीण रूग्णालय येथील स्विपर यांनी मृतदेह बाहेर काढले. पंचनामा करून शवविच्छेदना नंतर सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास संजयवर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थि होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या