गडचांदूर:-
कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे पुर्वी ग्रामपंचायत होती.ही 2014 मध्ये विसर्जित होऊन 2015 ला जेव्हा पहिल्यांदा नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली तेव्हा शिवसेनेचे सचिन भोयर यांना पहिल्यांदा नगरपरिषद उपाध्यक्ष पदाचा मान मिळाला.शिवसेनेच्या युवासेना जिल्हा प्रमुखपदी विरामान असलेले भोयर यांनी नगरपरिषदेच्या दुसर्या सार्वत्रिक निवडणूकी नंतर युवासेना पदाचा राजीनामा दिला मात्र शिवसेना सोडली नव्हती.असे असताना भोयर हे गेल्या अंदाजे 2,3 वर्षांपासून राजकारणात सक्रिय नव्हते.'आपण भले,आपलं काम भलं' असा त्यांचा नित्यक्रम होता.मात्र भोयर यांनी 30 जूलै 2022 रोजी शिवसेनेतून अचानकपणे काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊन राजकीय विरोधकांना एकच धक्का दिला. काँग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नुकतेच राजूरा विधानसभा क्षेत्रात आले होते.या निमित्ताने राजूरा येथील शिवाजी संकुलमध्ये आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात भोयर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

अत्यंत संयमी,शांत स्वभाव,मृदभाषी म्हणून परिचित असलेले भोयर हे काँग्रेसवासी झाल्याने पक्षाला अधिक बळकटी मिळणार ? असल्याची चर्चा शहरात ऐकायला मिळत असून खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे,आमदार अभिजीत वंजारी,माजी आमदार अविनाश वारजूकर,चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश देवतळे,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सचिन भोयर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.औद्योगिक शहर व मोठी लोकसंख्या असलेल्या गडचांदूर शहरात चांगला चेहरा काँग्रेसला मिळाल्याने पक्षाला नक्कीच फायदा होणार यात तिळमात्र ही शंकाच नाही,असे बोलले जात आहे.
(पक्षासाठी आपण एकनिष्ठेने काम करू,पक्षाने दिलेली प्रत्येक धुरा जबाबदारीने सांभाळू असे मत सचिन भोयर यांनी प्रवेशादरम्यान व्यक्त केल्याचे कळते.)
---------//--------
'कोरपना LIVE'
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या