Subscribe Us

header ads

उशिरा का होईना पण...!भाजपच्या त्या जनहिताच्या मागणीला यश.

गडचांदूर:-
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी गेल्यावर्षी शहरातील नागरिकांना गृहकर व पाणीपट्टी करावर 2 टक्के व्याज(दंड)वसुल करण्याचा ठराव सर्वानुमते घेतला होता.तो निर्णय अत्यंत चुकीचा व अन्यायकारक असल्याने नागरिकांना आर्थिक अडचणीत टाकणारा होता.आधीच कोरोनामुळे नागरिक आर्थिक संकटात सापडले,त्यावर नगरपरिषदेने लावलेला हा दंड,पुन्हा आर्थिक संकटात टाकणारा होता.नागरिकांची अडचण लक्षात घेता विरोधी पक्ष भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे यांनी या निर्णयाचा कडाडून विरोध केला.अनेकदा पत्र व्यवहार सुद्धा केले.सत्ताधारी लक्ष देत नसल्याचे पाहून भाजपतर्फे मोर्चा काढण्यात आला.तरीपण सत्ताधारी ऐकण्याच्या मनःस्थितीत दिसत नव्हते.अखेर नाईलाजाने 19 मे रोजी गडचांदूर भाजप दलित आघाडी प्रमुख प्रशांत खाडे व बब्लू रासेकर हे आमरण उपोषणाला बसले.जोपर्यंत 2 टक्के दंड वसूलीचा ठराव रद्द होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका यांनी घेतली होती. आंदोलनकर्त्यांचा रोष बघता नगरपरिषद सत्ताधारी व प्रशासनाने नमता घेत उपोषण स्थळी येऊन सदरची मागणी पुढील सभेत घेऊन मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर 18 जूलै रोजी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत तो ठराव सर्वानुमते रद्द करण्यात आला व भाजपच्या जनहिताच्या मागणीला यश प्राप्त झाले.नगरसेवक डोहे यांनी या निर्णयाचे स्वागत केले परंतू पूर्वी नागरिकांनी भरलेल्या दंडाच्या रकमेचा काय ? असा प्रश्न उपस्थित करत त्यांची रक्कम परत करा, किंवा पुढील वर्षाच्या टॅक्समध्ये जमा करा,अशी मागणी नगरसेवक अरविंद डोहे यांनी केली असून यासाठी पुढे लढा देऊन गडचांदूरकरांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे मत नगरसेवक डोहे यांनी व्यक्त केले आहे.आता यासंदर्भात नगरपरिषद काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या