राजूरा:-
राजुरा तालुक्यातील मौजा भेंडाळा येथील शहाबुद्दीन गफ्फार शेख वयवर्ष अंदाजे 40 या शेतकऱ्याचा शेतात पडून असलेल्या जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने करंट लागून मृत्यू झाला. शहाबुद्दीन हा मुळचा चिचबोडी येथील रहिवासी असून भेंडाळा येथील तलावा जवळील शेतात शेतीचे काम करीत असताना शेतात आधी पासूनतच तुटून पडलेल्या विद्युत तारेचा करंट लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याठिकाणी तार तुटुन पडली असतानाही विद्युत विभागाने कोणतीही दखल घेतली नाही,विज पुरवठा खंडीत केला नाही,यामुळे एक तरूण शेतकर्याला जीव गमवावा लागला.दरम्यान चंद्रपूर ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष शांतनु धोटे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत विज विभागाला धारेवर धरले.अखेल विद्युत विभागाचे अधिकारी घटनास्थळी येऊन त्यांनी विद्युत विभागाकडून मृतकाच्या परिवाराला 4 लाखाची तात्काळ मदत जाहीर केली.तसेच 20 हजाराची शिघ्र मदत मृतकाच्या परिवाराला केली आहे.यावेळी विरूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल चव्हाण, विद्युत अभियंता मकासरे,पोलीस पाटील बंडू रागीट,राजुरा विधानसभा युकाँ अध्यक्ष मंगेश गुरणुले,ईरशाद शेख, धनराज रामटेके,सतीश साळवे,विनोद धुमळे,दिनकर ठमके सह युकाँचे पदाधिकारी,कार्यकर्ते व गावकर्यांची उपस्थिती होती.
-------------//-----------
(कोरपना LIVE)
"सै.मूम्ताज़ आली"
0 टिप्पण्या