चिमूर प्रतिनिधी:-
जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळा सावरगाव येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले नगाजी साळवे यांची महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.यापुर्वी त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. याप्रसंगी अशोक वैध,सुधाकर पोपटे,अजय आस्कर, राम बोबडे इतरांची उपस्थिती होती.साळवे यांच्या निवडी बद्दल तालुक्यातील शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या