Subscribe Us

header ads

त्या...!दोन आयडॉल विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा.

मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली:-
'स्पर्धेचे युग आता केवळ गाव,जिल्हा,राज्य,देशापुरते मर्यादित राहिलेले नाही.सातासमुद्रापार आपले कर्तृत्व गाजवण्याची ही वेळ आहे.प्रामाणिक परिश्रमाने आपल्या कार्याचा ठसा जगभरात उमटवण्याचा ध्यास आपण घेतला पाहिजे.त्यासाठी विद्यार्थ्यांनो आता जागतिक स्पर्धेसाठी सक्षम व्हा' असे आवाहन दीपक चटप यांनी केले.ते प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालय तर्फे 22 जुलै रोजी गडचांदूर येथील बालाजी सेलिब्रेशन सभागृहात आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सत्कार सोहळ्यात बोलत होते.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव ठेंगणे होते तर जि.प.चे माजी सभापती अरूण निमजे,पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे,सुनील बोरीकर,धर्मराज मुंडे, भाऊराव झाडे,बालाजी पुरी,अविनाश पोईनकर,रमेश राठोड,संतोष पाल,चेतना चव्हाण,स्वप्निल जेनेकर,मंदे सर,पुंजेकर सर आदी मान्यवरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
अॕड.दीपक चटप यांना ब्रिटीश सरकारची 45 लाखांची जागतिक प्रतिष्ठेची 'चेव्हनिंग' शिष्यवृत्ती मिळाली तर प्रतीक बोरडे हा 'MPSC' उत्तीर्ण होऊन नायब तहसीलदार बनल्याने या दोन्ही शेतकरी पुत्रांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रतिक बोरडे यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करतांना समर्पित भावनेने अभ्यासाशी नाते जोडणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत अगदी मोकळ्या मनाने आपल्या यशाचा प्रवास उलगडला.गडचांदूरात स्पर्धा परिक्षेचे वातावरण निर्मीतीसाठी प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालय,विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहे.असे मत माजी जि.प.सभापती अरूण निमजे यांनी व्यक्त केले. विद्यार्थी देश विकासाचा पाया आहे.देशासाठी स्वत:ला घडवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नामदेव ठेंगणे यांनी अध्यक्षस्थानावरून केले.शाहीर संभाजी ढगे यांनी स्वागत गीताने कार्यक्रमात रंगत भरली‌.
संचालन प्रा.नानेश धोटे,प्रास्ताविक प्रा.राहूल ठोंबरे तर आभार प्रा.शितल चन्नेकर यांनी मानले.प्रेरणा गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.यावेळी मोठ्यासंख्येने महाविद्यालय तसेच परिसरातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
                    ---------//-------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या