Subscribe Us

header ads

घात की अपघात ? कारण गुलदस्त्यात...!

गडचांदूर प्रतिनिधी:- 
  गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या भोयेगाव येथे एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना 8 जूलै रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीला आली.मृतक युवकाचे नाव सचिन पानघाटे वयवर्ष 26 असे आहे.प्राप्त माहितीनुसार भोयेगाव येथील स्वागत गेट जवळील एका पानठेल्याच्या मागे सचिनचा शव मिळाला. सचिनचा घात की अपघात ? कारण अद्याप गुलदस्त्यात असताना हा अपघात नसून घात असल्याची चर्चा गावात सुरू आहे.सचिन हा आई वडीलाचा आधार होता.त्याच्या जाण्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.गडचांदूर पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालय येथे पाठवले आहे.सचिनचा घात की अपघात ? यासंदर्भात लवकरच सत्य बाहेर येतील.उपविभागिय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सत्यजित आमले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस तपास करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या