मुख्यसंपादक सै.मुम्ताज़ अली:-
जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांची संकल्पना व मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर अंतर्गत सायबर सेल,भरोसा सेल आणि पोलीस स्टेशन पडोली,यांच्या संयुक्त विद्यमाने 19 जुलै रोजी घुग्घुस रोड वरील वांढरी येथील श्रीमती विमलादेवी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल,येथील विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण,पोक्सो कायद्याबाबत जागरुकता उपक्रम राबविण्यात आला.
स्त्रिया,मुले,मुलींवरील अन्याय,अत्याचार दूर करण्यासाठी प्रभावी कायदे आणि त्याची कठोर अमलबजावणी आवश्यक असताना त्याचबरोबर आवश्यक आहे ती जनजागृती आणि विद्यार्थ्यांना योग्यवेळी मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे वाढत्या सायबर अपराधांची घटना पहता सायबर सुरक्षा व उपाययोजना याविषयावर सुद्धा शाळा,महाविद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रम राबवले तर विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीमध्ये स्व-संरक्षण आणि सायबर सुरक्षा बाबत जागरूकता निर्माण होऊन निश्चितच वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल. याच दृष्टिकोनातून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पडोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेश कोंडावार यांनी स्त्रीया व मुली संरक्षण स्व-संरक्षणाबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.तर पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अश्विनी वाकडे भरोसा सेल चंद्रपूर यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्यांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात दाखल व तपास केलेल्या गुन्ह्यांविषयक माहिती,उदहारणे देऊन मुला, मुलींनी शैक्षणिक वयात काय चुका करू नये ? केल्यास त्याच्या दुष्परिणामाबाबत अवगत केले.तसेच सायबर सेलचे मुजावर अली यांनी विद्यार्थ्यांना आॕनलाईन शिक्षणादरम्यान इंटरनेट,मोबाईलच्या केलेल्या दुरूपयोगाचे दुष्परिणामाबाबत घडलेल्या गुन्ह्यांचे उदहारणे देवुन शालेय जीवनात मोबाईल तंत्रज्ञानाचा सदुपयोग करून आपले जीवन कसे सफल करता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
तसेच या मेडिकल कॉलेजचे उपप्राचार्य संदेश गोजे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावनेत स्त्रिया व मुली तसेच वाढत्या सायबर अपराधांपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली सुरक्षितता कशी बाळगावी याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.सदर जागरूकता उपक्रमच्या यशस्वीतेसाठी मेडिकल कॉलेजचे संचालक, अध्यक्ष इंद्रसेनसिंह ठाकूर तसेच शिक्षक, शिक्षीका वृंद आणि सदर महाविद्यालयातील 400 च्या जवळपास मेडिकल विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मेडिकल कॉलेजचे विशाखा समिती अध्यक्ष व प्राध्यापिका प्रणिता भाकरे यांनी केले.
0 टिप्पण्या