Subscribe Us

header ads

शेतकरी मार्गदर्शन व कार्यशाळा....!

गडचांदूर प्रतिनिधी:-
अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर फाउंडेशनतर्फे शेतकरी मार्गदर्शन व कार्यशाळा उत्तम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.याचा विचार करीत अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर फाउंडेशन आवारपूर नजीकच्या बारा गावातील शेतकऱ्यांसाठी गजानन जाधव सर लेखक 'व्हाईट गोल्ड एक नवी दिशा' यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन ए.सी.डब्ल्यू. स्पोर्ट क्लब आवळपूर सिमेंट वर्क्स येथे करण्यात आले.या कार्यक्रमात अल्ट्राटेकचे युनिट हेड श्रीराम पी.एस.छयांच्या हस्ते गजानन जाधव सर यांचे शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला आणि कर्नल दीपक डे महाप्रबंधक अल्ट्राटेक सिमेंट आवळापूर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाला नजीकच्या गावातील जवळपास 200 शेतकऱ्यांचा सहभाग होता.यात सरपंच सचिन बोंडे सांगोडा,उपसरपंच बाळकृष्ण काकडे आवारपूर, शत्रुघन शेडमाके नोकारी यांचा सुद्धा सहभाग होता. शेतकऱ्यांना युनिट हेड श्रीराम पी.एस.यांनी आपल्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव तत्पर राहू असे नवनवीन उपक्रम राबवू असे सांगितले. कर्नल दीपक डे यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.मुख्य मार्गदर्शनात गजानन जाधव यांनी शेतकऱ्यांना फवारणी,पीक,पिकांची वाढ, कीटकनाशक बियाणे,पाणी जमिनीची उपज, नवनवीन उत्पादनवर जवळपास 2 तास माहिती दिली.सोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे समाधान सुद्धा केले.त्यांनी आपल्या मार्गदर्शनात पुस्तकाचे वितरण केले.कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांनी उत्तम असा कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर फाउंडेशन आवळापूरचे आभार मानले.सर्व शेतकऱ्यांना अल्पहाराची व्यवस्था करण्यात आली होती.दीपक डे यांच्या मार्गदर्शनात सीएसआर प्रमुख सतीश मिश्रा,सचिन गोवारदिपे, डॉ.गोदावरी नवलानी विशेष करून संजय ठाकरे,देविदास मांदाळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अथक प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या