Subscribe Us

header ads

अभिनंदनाचा वर्षाव....!

गडचांदूर प्रतिनिधी:-
विधायक कामाचा वसा घेतलेल्या दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबातील ॲड.दीपक यादवराव चटप हा तरूण वकील ब्रिटिश सरकारचा 'चेव्हनिंग ग्लोबल लिडर' ठरला आहे.ब्रिटीश सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या 'चेव्हेनिंग' या जागतिक प्रतिष्ठेच्या 45 लाखांची शिष्यवृत्तीचा दिपक मानकरी ठरला आहे. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी शिष्यवृत्ती मिळवणारा दीपक हा देशातील पहिला तरूण वकील ठरला आहे. सामाजिक नेतृत्व करू इच्छिणाऱ्या जगभरातील युवकांना ब्रिटिश सरकार ही शिष्यवृत्ती देते.लंडनच्या 'सोएस' या जगातील सर्वोत्तम विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी दीपकची निवड झाली असून त्याच्या कामाची दखल घेत शिक्षणासाठीच्या संपुर्ण खर्चाची जबाबदारी ब्रिटीश सरकारने घेतली आहे. गावाचा नाव लौकिक करणार्‍या दीपकवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून मित्र परिवारासह विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते,राजकिय नेते, गणमान्य मंडळींकडून अविरतपणे सत्काराची मालिका सुरू आहे.याच पार्श्वभूमीवर भाजप महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस तथा गडचांदूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे,भाजप महिला आघाडी जिल्हा सचिव सौ.रंजना मडावी,भाजपा नेत्या सौ.सपना सेलूकर सह इतरांनी दीपकचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व भविष्यातील वाटचालीबद्दल मनापासून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या