गडचांदूर:-
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, शरदराव पवार कला वाणिज्य महाविद्यालय तथा सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी' ध्वजारोहण कार्यक्रम सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.आनंदराव अडबाले यांच्या हस्ते पार पडला.याप्रसंगी मंडळाचे अपाध्यक्ष तु.ता.पंजेकर,मंडळाचे सदस्य नो.शा.मंगरूळकर,मा. ना.मंदे,सदस्या श्रीमती नलिनी डोहे,विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे,शरदराव पवार कला, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय कुमार सिंह,इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कु. गुडधे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक,पालक वृंद,प्राध्यापक,शिक्षक,उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.रिमझिम पावसाच्या हजेरीत भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाची आहुती देण्याऱ्या त्या थोर क्रांतिकारकांना स्मरून 75 वा ध्वजारोहण सोहळा पार पडला.
--------//-------
'कोरपना LIVE'
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या