Subscribe Us

header ads

उपाध्यक्षांच्या वाढदिवसाला नगरपरिषदेचे ग्रहण.

गडचांदूर:- 
     गडचांदूर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी हे काहीना काही कारणाने सतत चर्चेत असतात.असाच एक प्रसंग 1आॕगस्ट रोजी घडला.निमित्त होते जोगी यांच्या वाढदिवसाचे.नेहमीप्रमाणे त्यांच्या चाहत्यांनी यंदाच्या वाढदिवशी अख्खे शहर भर शेकडो बॅनर लावले.मुख्य मार्गावरील डिवायडर असो की शहरातील चौक,सगळीकडे यांच्या शुभेच्छांचे बॅनरच दिसत होते.हे तर काहीच नाही.हरदोना बस स्टँड,थुटरा बस स्टँड व इतर ठिकाणी सुद्धा यांचे बॅनर दिसत होते.आता आपले भाऊच नगरपरिषदेचे उपाध्यक्ष असल्याने यांच्या बॅनर लावण्यासाठी नगरपरिषदेची परवानगी घेण्याची गरज का ? यामुळे यांनी परवानगी न घेता शहर चक्क बॅनरमय केले.असे असताना जेव्हा नगरपरिषदेचे कर्मचारी हे बॅनर काढण्यासाठी एकाठिकाणी पोहोचले असता तेव्हा जोगी व त्यांच्या समर्थकांनी राडा करत बॅनर काढण्यापासून त्या कर्मचाऱ्यांना मज्जाव केला.
प्राप्त माहितीनुसार नगरपरिषदेने उच्च न्यायालय मुंबई खंडपीठाला एका स्टॅम्प पेपरद्वारे माहिती दिली की, शहरात कोणत्याही कार्यक्रमाचे होर्डिंग्ज,बॅनर लावलेले नाही.आणि लावू दिले जाणार नाही. वास्तविक पाहता बॅनर लावताना यांनी विचारायला पाहिजे होते.मात्र अशी कोणतीही माहिती यांनी दिली नसल्याचे कळते. बॅनर काढल्याचा राग मनात धरून उपाध्यक्ष शरद जोगी यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांविरूद्ध स्वतःच्या स्वाक्षरीने तक्रार दिली आहे.यामध्ये विविध प्रकारचे आरोप कर्मचाऱ्यांवर लावण्यात आले आहे.कायद्याचे ज्ञान नसलेल्या नगरपरिषदेच्या एका जबाबदार व्यक्तीकडून असे कृत्य होणे,आश्चर्याचकीत करणारा प्रकार असून यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. मुख्याधिकारी यादिवशी नगरपरिषदेत हजर नसल्यामुळे काय करावे,काय नाही,हे समजत नसल्याची खंत काही कर्मचारी व्यक्त करताना यावेळी दिसून आले.
उपाध्यक्षांनी पदाचा दुरूपयोग करत कर्मचाऱ्यांना दिलेली वागणूक योग्य की अयोग्य हे मुख्याधिकारी यांनीच ठरवावे.अयोग्य असेल तर यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी पावले उचलण्याची गरज आहे.आता ते याप्रकरणी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.काही का असेना पण हल्ली नगरपरिषदेत सुरू असलेला सावळा गोंधळ व सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत विरोध प्रकर्षाने समोर आल्याची खमंग चर्चा सध्या शहरात ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे हे मात्र विशेष. 
घडलेल्या प्रकाराबद्दलची हकीकत नगरपरिषदेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना विचारले असता 'आम्ही आमचे कर्तव्य बजावत होतो.बॅनर काढताना बॅनर वरील कोणतेही नेते किंवा कार्यकर्त्यांच्या फोटोंचे कसलेही अपमान,अनादर आम्ही केलेले नाही नाही,बॅनर काढत असल्याचा राग मनात धरून आमच्यावर खोटे व बिनबुडाचे आरोप उपाध्यक्षाकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 
                 ---------//--------
                                  'कोरपना LIVE'
                                     मुख्यसंपादक 
                                   सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या