गडचांदूर:-
गडचांदूर सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय येथे लोकशाहीर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त या महापुरुषांना अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते.त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शना पर भाषणातून दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा संचालक सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख ज्येष्ठ शिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे तर आभार राजेश मांढरे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी शाळेचे पर्यवेक्षक संजय गाडगे,बावनकर सर,मरसकोल्हे सर, ज्योती चटप,जी.एन.बोबडे,एस.यु.पाटील,भालचंद्र कांगरे,सुषमा शेंडे,माधुरी उमरे,राजेश वासेकर, भुवनेश्वरी गोपंमवार,शशिकांत चन्ने यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
---------//--------
'कोरपना LIVE'
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या