गडचांदूर:-
गडचांदूर नगरपरिषदेत काही दिवसापुर्वी एक मिटींग झाली.त्यामध्ये असं ठरलं की,आपण एक आठवडाभर स्वच्छता मोहीम,जनजागृती,रॅली अशा विविध माध्यमातून देशा प्रती नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी,मनामध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी,ज्या थोर महात्मांनी देशासाठी बलिदान दिले याची आठवण येणार्या पिढीला व्हावी यासाठीची रूपरेषा नगरपरिषदेने आखली होती.यालाच अनुसरून पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची सुध्दा मिटींग झाली आणि नगराध्यक्षा व ठाणेदारांनी या साऱ्या गोष्टींच्या सुचना उपस्थितांना दिल्या.परंतू गडचांदूर शहरामध्ये आता दोन,तीन दिवसानंतर देशाच्या स्वतंत्र्याचा 75 वा उत्सव येऊन ठेपला असताना विविध ठिकाणी बारकाईने लक्ष दिले तर चोहीकडे या नगरपरिषद हद्दीत घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे.
उदाहराणार्थ अमलनालाकडे जाणार्या मुख्य मार्गावरील महात्मा गांधी शाळेच्या भिंतीला लागून असलेली नाली मागील कित्येक दिवसांपासून पुर्णपणे जाम झालेली आहे. यामध्ये अळ्या निर्माण झाल्या असून खराब पाणी सरळ रस्त्यवर जात आहे.यामुळे लोकांना ये-जा करण्यासाठी खुब त्रासदायक ठरत आहे. या रसत्यावर रहदारी जास्त आहे आणि याला लागूनच शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा मोठ्याप्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याला लागूनच आठवडी बाजार आहे.दर मंगळवारी याठिकाणी मोठा बाजार भरतो.
याठिकाणी कुत्रे,डुकरं,मोकाट जनावर अक्षरशः ठाण मांडून बसले आहे.यांनी घान पसवल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नगरपरिषदेचे जवळपास सर्वजण या रसत्याने येणेजाणे करतात.मात्र यांना ही दयनीय अवस्था दिसत नसेल का? हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.एकीकडे देशात स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवमश मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे तर दुसरीकडे याठिकाणी अशी अवस्था,ही शोकांतिकाच असून अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यांनी जे सुचना जनतेला केल्या आहे त्याप्रमाणे लोक आपापल्या परीने जनता पालन करेलच पण गरपरिषद काय करत आहे.
नगरपरिषद म्हणतात रॅलीमध्ये सहभागी व्हा आणि तुम्हीच झोपून आहे.तुम्ही स्वतः काळजी घ्या,स्वच्छता मोहीम राबवा पण असं होताना दिसत नाही.एकुण अशी दयनीय अवस्था सध्या याठिकाणी बनली आहे.मुख्य मार्गाची जर ही दशा असेल तर शहरातील गल्लीबोळात काय असेल ? ही वेगळं सांगायची गरज नाही.सत्ता कुणाचीही असो आणि मी सत्ता पक्षाचा असला तरी हे जे याठिकाणी नगरपरिषदेचे काम सुरू आहे हे बरोबर नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव रफीक निज़ामी यानी व्यक्त केले आहे.
विरोधी नगरसेवकांनी मुद्दा उचलला तर सत्ताधारी म्हणतात विरोधी पक्षाला आरोप करण्याची सवयच आहे मग आता मित्र पक्षाच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने मुद्देसहीत केलेले हे जळजळीत आरोपांना काय म्हणाल ? अशी विचारणा होत आहे. नगरपरिषद सत्ताधाऱ्यांना मिळालेला हा घरचा आहेर सुरू असलेल्या कारभाराची पोलखोल करणारा व झनझनीत अंजन घालणारा असल्याची चर्चा सुरू असून यापासून सत्ताधारी धडा घेतील का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
----------//---------
'कोरपना LIVE'
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या